कोल्हापूरची अंबाबाई महाविष्णू स्वरूपात दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदा शारदीय नवरात्रोत्सवात करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे करवीर महात्म्यातील निवडक स्तोत्रांमधून होणारे दर्शन ही संकल्पना राबविली आहे. आज द्वितीयेला करवीरनिवासिनी ही पराशरांना महाविष्णुस्वरूपात दर्शन देताना विराजमान झालेली आकर्षक पुजा बांधण्यात आली.

श्रीमहालक्ष्मी जेव्हा घोर तप करणाऱया पराशरांना महाविष्णू स्वरूपात दर्शन देते तेव्हा त्यांचा सर्व संशय, भेदभाव फिटतो. ते महालक्ष्मीला विष्णुस्वरूपिणी जाणून तिच्यापुढे नतमस्तक होतात. सर्व संशय हरण करणाऱया अष्टकाने स्तुती करतात अशा अर्थाने श्रीपुजक माधव मुनिवर व मकरंद मुनिश्वर यांनी ही पुजा बांधली आहे.