
मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारची मदत लागली आणि घटना बदलण्याचा विषय असेल तर त्याबाबतही माझा अभ्यास सुरू आहे, असे वक्तव्य खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज केले. महापुरानंतर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर पंढरपूर येथे वक्तव्य केले.
छत्रपती संभाजीराजे म्हणाले, ‘आपण एसीबीसी हा कायदा तयार केला आहे. मराठा समाज हा सामाजिकदृष्टय़ा मागास असल्याचे मागासवर्गीय आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे ते सिद्ध झाले आहे. दरम्यान, विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या कायद्याला मंजुरी दिली आहे. तो पारित झाला असून हायकोर्टानेही त्याला मान्यता दिली आहे. तरीही मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर केंद्र सरकारची काही मुव्हमेंट असेल उदा. घटना बदल करायची असेल तर त्यादृष्टीनेही माझा अभ्यास सुरु आहे. घटनाबदल केल्यास तो विषय देशासाठीच लागू होईल’ असेही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.























































