अमेरिकन निवडणुकीची खरी झळ कोणाला?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> कर्नल अभय बा. पटवर्धन

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जर अमेरिकन जनतेने डोनाल्ड ट्रम्प यांना नाकारले तर 1992नंतर पहिल्यांदाच विद्यमान अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक हरलेले बघायला मिळतील. निकालामुळे ट्रम्प स्वतः तर निराश होतीलच, पण तुर्पस्तान, उत्तर कोरिया, इस्रायल, पोलंड, हंगेरी आणि हिंदुस्थानसारख्या देशांचे राष्ट्रप्रमुखदेखील निराश होतील. एक मात्र खरे की, ट्रम्प यांच्या गच्छंतीनंतर अमेरिकेचे परराष्ट्र धोरण परत एकदा मूळ पदावर येईल. अमेरिका पुन्हा लोकशाही, मानवाधिकार, पर्यावरण यांसारख्या जागतिक प्रश्नांमधे गुंतली जाईल. राजकीय व संघटनात्मक तहांच्या (पॉलिटिकल अलायन्सेस) जाळ्यात ओढली जाईल.

‘धिस प्रेसिडेंट एम्ब्रेसेस ऑल द ठग्ज इन द वर्ल्ड’’ असा आरोप ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी जो बायडेन यांनी निवडणूक प्रचारात केला. त्यावरून ट्रम्प निवडणूक हरले तर अमेरिका कोणत्या दिशेने जाईल याची कल्पना येते.

उत्तर कोरिया
उत्तर कोरिया आणि तेथील हुपूमशाहा किम जॉन ऊन याच्याशी असलेल्या अमेरिकनसंबंधांत राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकीर्दीत आमूलाग्र बदल झाला. आधी दोघांनी एकमेकांना धमक्या दिल्या, एकमेकांचे वाभाडे काढले, पण नंतर त्यांच्यात एक वेगळ्याच प्रकारची ‘लव्ह-हेट रिलेशनशिप’ निर्माण झाली. ट्रम्प यांनी उत्तर कोरियावरील अनेक बंधने सैल केली, काही नवीन बंधने टाकली. “वुई हॅव मिस्टरियसली वंडरफुल केमिस्ट्री’’ या ट्रम्प यांच्या टिपणीवरून त्यांच्या गोड-तिखट संबंधांची कल्पना येते. अर्थात बायडेन यांनी ते राष्ट्रपती झाल्यास “आय विल नॉट मीट एनिबडी विदाऊट प्रिपंडिशन्स ऑर लिफ्ट सँक्शन्स’’अशी ग्वाही दिली आहे. बायडेन यांच्या राजवटीत किम जॉन ऊन याला अमेरिकेचा सर्वंकष, खंबीर पाठिंबा असलेल्या दक्षिण कोरियाशी संघर्ष करावा लागेल.

सौदी अरेबिया
राष्ट्राध्यक्ष बनल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या परराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात 2017 मधील सौदी अरब दौऱयाने केली. त्यांचे वास्तव्य असलेल्या आलिशान हॉटेलच्या मुख्य भागावर त्यांचा लेझर किरणांनी चितारलेला चेहरा झळकत होता. ट्रम्प यांच्या एअरपर्ह्स वन विमानातून उतरल्यावर त्यांचे सारथ्य करणाऱया महंमद बिन सुलतान या सौदी राजपुत्राने (क्राऊन प्रिन्स) आपले वाक्चातुर्य आणि लाघवी स्वभावाने ट्रम्प यांना संपूर्णतः जिंकले. 2015मध्ये तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सौदी अरबचा कट्टर शत्रू असणाऱया इराणशी आण्विक करार केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी राजपुत्राच्या मैत्रीखातर या करारातून बाहेर पडत त्याला तिलांजली दिली. बायडेन राजवटीत मात्र मानवाधिकाराला प्राधान्य मिळेल, ओबामांप्रमाणेच अमेरिकेचा कल इराणकडे झुकेल याची शक्यता नाकारता येत नाही.

तुर्कस्तान
नॉर्थ अॅटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनचा सदस्य असलेल्या तुर्पस्तानचे राष्ट्रपती रिसेप तय्यिप एर्दोगन यांच्यावरही ट्रम्प मेहेरबान होते. किंबहुना, सौदी अरबच्या महंमद बिन सुलतानपेक्षा एर्दोगन हे ट्रम्प यांचे जास्त लाडके आहेत असे म्हटल्यास ते वावगे होणार नाही. तुर्पस्तानने रशियाकडून एस 400 मदत दिली पाहिजे असे आवाहन करणारे बायडेन निवडणूक जिंकल्यास रिसेप तय्यिप एर्दोगन यांना मोठे वैयक्तिक नुकसान होणार हे निश्चित आहे. तथापि बायडेनचा मुस्लिमधार्जिणेपणा त्यांची नैया पार करवेल हे नक्की.

चीन
डोनाल्ड ट्रम्प हे अतिशय आक्रमक पवित्रा घेत चीनवर व्यापारी बंधन टापून त्याला होणारे तंत्रज्ञान हस्तांतर रोखणारे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष असले तरी बायडेनच्या तुलनेत चीन ट्रम्प यांनाच झुकते माप देतो आणि देईल. 1950पासून अमेरिकाही चीनविरोधात आहे. त्या काळापासून अमेरिकन प्रशासनासमोरील चीनचा प्रभाव ट्रम्प यांनी सत्तेत आल्याबरोबर कमी करायला सुरुवात केली. आपल्या ‘अमेरिका फर्स्ट’ पॉलिसीअंतर्गत त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय करारांना फाटय़ावर मारले. त्यामुळे निर्माण झालेली आर्थिक, सामरिक, व्यापार, पर्यावरण आदी क्षेत्रातील नेतृत्व पोकळी भरून काढण्यासाठी चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिन पिंग यांना वाव मिळाला आणि त्यांनी या संधीचे सोने केले, पण चीनच्या कोविड-19 या कोरोना विषाणूंमुळे अमेरिका आणि जगाला जी विपदा झेलावी लागली त्याबद्दल चीनवर कारवाई करण्याची मागणी ट्रम्प सातत्याने करीत आहेत. या विषयावर बायडेन यांचे काय विचार आहेत ते अजूनही स्पष्ट नाही. बायडेन हे ट्रम्प यांनी घातलेली बंधने तर कमी करणार नाहीतच, पण ते परत एकदा चीनविरोधात समन्वयी, आंतरराष्ट्रीय आघाडी उभी करतील आणि त्यामुळे जग शीतयुद्धाच्या गर्तेत लोटले जाईल अशी सार्थ भीती चीनला वाटते. अर्थात दुसरीकडे ट्रम्पसारख्या खमक्या, पण मनाचा थांग न लागणाऱया नेतृत्वापेक्षा बायडेन यांच्यासारखे नेभळट नेतृत्व चीनसाठी लाभदायक आहे असे ‘ग्लोबल टाइम्स’ या चिनी मुखपत्राचे मत आहे.

रशिया
2016 मध्ये झालेल्या निवडणुकीतील ट्रम्पच्या विजयामुळे पुतीन आणि रशियाला मात्र जॅकपॉट लागला. सोव्हिएत युनियन-रशियाविरोधात अमेरिकेने उभारलेल्या आंतरराष्ट्रीय गठबंधनाला तोडण्यासाठी जोसेफ स्टॅलिनपासून पुतीनपर्यंत सर्व रशियन नेत्यांनी केलेल्या असफल प्रयत्नांना ट्रम्प यांनी लेखणीच्या एका फटकाऱयानिशी मूर्त स्वरूप दिलं. जर ट्रम्प परत निवडून आले तर ही प्रथा चालूच राहील असे रशियाला वाटते. ट्रम्प यांनी रशियावरील अनेक आर्थिक व सामरिक बंधने सैल केली, काही उठवली. रशियन हत्यारे विक्रीलाही अमेरिकेची सशर्त अनुमती मिळाली आहे. हिंदुस्थान व तुर्पस्तानला रशियन एस 400 क्षेपणास्त्र्ाांची विक्री, इराणला सामरिक मदत, सौदी अरब, तुर्पस्तान आणि पाकिस्तानला लढाऊ विमानांची रशियन विक्री ट्रम्प यांच्या मंजुरीशिवाय शक्य झाली नसती. ट्रम्प पराभूत झाल्यास या सर्वांवर चाप बसून आपण परत आर्थिक गर्तेत लोटले जाऊ अशी भीती रशियाला वाटते आहे. रशिया ट्रम्प यांना जवळचा होता. त्याचे अनेक सामरिक अपराध त्यांनी पोटात घातले आहेत. प्रत्येक आंतरराष्ट्रीय चर्चेत त्या दोघांची जवळीक वेळोवेळी उघड झालेली प्रत्ययाला येते.

ब्राझिल
ब्राझिलचे राष्ट्रपती जैर बोल्सोनरो यांच्यासाठी तर ट्रम्प देवदूतच आहेत. बायडेन निवडून आल्यास त्यांच्यावरील संकटे वाढतील. 2019 मध्ये सत्तेत आलेल्या जैर बोल्सोनरोंनी ब्राझिलच्या परराष्ट्र धोरणांची सांगड अमेरिकेशी घातली. उत्तरादाखल ट्रम्प यांनी ब्राझिलच्या ताज्या गोमांस आयातीवरील बंधन पूर्ण उठवून त्यांच्याशी अंतरिक्ष शोधन, समन्वय आणि संरक्षण करार केले. ब्राझिलला ऑर्गनायझेशन फॉर इका@नॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट या संघटनेत प्रवेश मिळावा म्हणून ट्रम्प प्रयत्न करीत आहेत. सत्तेत आल्यापासून ब्राझिल सीमेवरील अवैध घुसखोरीला पायबंद घालण्यासाठी मोठी भिंत बांधण्यासाठी ट्रम्प अक्षरशः तडफडत आहेत. मात्र ट्रम्प यांनी जैर बोल्सोनरो ब्राझिलचे राष्ट्रपती झाल्यावर त्या प्रकल्पाला थंडय़ा बस्त्यात टाकले आणि अॅमेझॉन नदीतील झाडांच्या कत्तलीकडेही कानाडोळा केला. पहिल्या वर्षी ‘अँटीब्राझिल’ असणारे ट्रम्प चौथ्या वर्षात ‘प्रो ब्राझिल’ झाले.

इस्रायल
2018 मध्ये वादग्रस्त गोलन टेकडय़ांवरील इस्रायली सार्वभौमत्वाला मान्यता देऊन आणि तेल अवीवमधील अमेरिकन दूतावास जेरुसलेमला नेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या प्रतिष्ठsत मोठी वृद्धी करवली खरी, पण आंतरराष्ट्रीय दडपणाला बळी पडून पॅलेस्टिनियन अधिपत्याखालील पश्चिम किनाऱयाच्या इस्रायलमधील विलयाला मात्र वाटाण्याच्या अक्षता लावत पुढे ढकलले. ट्रम्प परत एकदा निवडून आल्यास हा विलय मूर्त स्वरूप धारण करेल यात शंकाच नाही. सप्टेंबर 2020मध्ये इस्रायल आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात तसेच बहरिनमध्ये झालेल्या ऐतिहासिक शांती करारानंतर अमेरिकन काँग्रेसमधल्या इस्रायली समर्थकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. अशा परिस्थितीत मुस्लिमधार्जिणे जो बायडेन आणि कमला हॅरिस निवडून आल्यास इस्रायलला होणाऱया अमेरिकन मदतीत मोठी कपात होईल, शिवाय नवे सरकार इराण न्यूक्लियर डील पुनरुज्जीवित करेल अशी भीती बेंजामिन नेतान्याहूंना वाटते. मुस्लिम आतंकवादाशी लढणारा इस्रायल अमेरिकन मदतीशिवाय तेथील आक्रमक मुस्लिम राष्ट्रांना कसे तोंड देईल हे येणारा काळच सांगेल.

पोलंड आणि हंगेरी
पोलंडचे राष्ट्रपती अँड्रझेझ दुडा आणि हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन हे दोघेही ‘का@न्झर्वेटिव्ह ख्रिश्चन व्हॅल्यूज’ या उदार विचारसरणीचे पुरस्कर्ते असल्यामुळे 2017 मध्ये ट्रम्प यांनी वॉर्सा येथे दिलेल्या भाषणानंतर त्यांचे खंदे समर्थक झाले आहेत. “जगात आणि व्हाईट हाऊसमध्ये ‘डेमोव्रॅटिक मॉरल इम्पिरिअलिझम’ लागू होऊ नये यासाठी बायडेनचा पराभव आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय आवश्यक आहे’’ हे प्रतिपादन व्हिक्टर ऑर्बन यांनी केले आहे.
बायडेन चांगले नागरिक आहेत, पण काही बाबतीत ते कमपुवत आहेत. त्यामुळे ते हिंदुस्थान आणि इतर काही देशांसाठी चांगले आणि सोयिस्कर सिद्ध होणार नाहीत. डेमोव्रॅटिक पक्ष अजूनही ओबामा काळातून बाहेर पडलेला नाही. ट्रम्प यांनी काही गोष्टी केल्या आहेत, ज्या बायडेन नक्कीच बदलतील. मुळात जग ओबामा काळातून बाहेर पडले आहे. बायडेन यांनीसुद्धा ट्रम्प काळापासून पुढे जायला पाहिजे. मात्र त्यांच्या प्रचार सभांमधील वक्तव्यांवरून ते आजही ओबामा काळातच घुटमळत आहेत हे प्रत्ययाला येते. आजमितीला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इराण, चीन आणि रशियाचे बावटे फडफडताना दिसतात. प्रसार माध्यमांमध्ये बायडेन यांच्या विजयाची भविष्यवाणी वर्तवली जात असली तरी प्रत्यक्षात ट्रम्प यांचे पारडे जड आहे हे अमेरिकेतील तज्ञ, मित्र आणि सामान्य नागरिकांशी केलेल्या वार्तालापामधून प्रत्ययाला येते. आजतागायत 62 दशलक्ष अमेरिकन मतदारांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग केले आहे. 3 नोव्हेंबर रोजी उर्वरित 90 दशलक्ष मतदार मतदान करतील आणि त्याच आठवडय़ात निकाल जाहीर होतील. ज्यांचे भवितव्य ट्रम्प यांच्या जय-पराजयावर अवलंबून आहे, त्यांना निकालासाठी वाट पाहणे अपरिहार्य आहे.

ट्रम्प किंवा बायडेन यांच्यापैकी कोणीही अमेरिकेचा नवा राष्ट्रपती बनला तरी हिंदुस्थानवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. कारण अमेरिका व्यापारी देश आहे आणि हिंदुस्थानची बाजारपेठ खूप मोठी व आकर्षक आहे. हिंदुस्थान आर्थिक आणि सामरिकदृष्टय़ा सबळ देश आहे. आपल्याला जी शस्त्र्ाास्त्र्ाs आणि संरक्षण सामग्री पाहिजे आहे, ती अमेरिका विपू इच्छिते. हे ‘व्यापारी-ग्राहक समीकरण’ आहे आणि ते कायमच राहील. फक्त हिंदुस्थानी प्रशासन, राजकीय नेते आणि जनता ट्रम्पऐवजी बायडेन यांना स्वीकारतील का, हा खरा प्रश्न आहे. ब़ायडेन, कमला हॅरिस आणि त्यांचा डेमोव्रॅटिक पक्ष पाकिस्तानधार्जिणे आहेत. त्यांच्या निवडणूक प्रचाराचा मोठा भाग अमेरिकेतल्या प्रो पाकिस्तानी लॉबीने उचलला असल्यामुळे बायडेन नक्कीच पाकिस्तान व मुस्लिम देशांना झुकते माप देतील. बायडेन यांना चीनबद्दलही ‘सॉफ्ट का@र्नर’ आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी हिंदुस्थानबरोबर जे संरक्षण करार केले, त्यावर बायडेन पाणी फेरू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांचे समीकरण वेगळे होते. अमेरिकेतील ‘हाऊ डी मोदी’ आणि हिंदुस्थानातील ‘अब की बार ट्रम्प सरकार’ या संकल्पनांवरून त्यांच्या एकमेकांशी असलेल्या घनिष्ठ संबंधांची कल्पना करता येते. हिंदुस्थानला धडा शिकवण्याच्या चिनी महत्त्वाकांक्षेला खोडा घालण्याची हिंमत एकटय़ा ट्रम्प यांच्यात होती आणि आहे. त्यामुळेच ट्रम्प यांच्या पराभवामुळे हिंदुस्थानला, त्यातही पंतप्रधान मोदींना सर्वात जास्त हानी पोहोचेल.

z [email protected].