कश्मीरात धुमश्चक्री, हिजबुलच्या टॉप कमांडरचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू काश्मीरात पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी मिळून केलेल्या कारवाईला मोठे यश प्राप्त झाले आहे. या कारवाईत दोन्ही पोलिसांनी मिळून दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनचा टॉप कंमाडर सैफुल्ला उर्फ डॉक्टर साहेब याला ठार मारले. तर आणखीन एका सशंयिताला अटक केली असून पोलिसांना त्याच्याकडून एके – 47 रायफल प्राप्त झाली आहे. श्रीनगरमध्ये रविवारी दुपारी पोलिसांनी ही कारवाई केली असून यामुळे हिजबुल मुजाहिदीनचे कंबरडे मोडले आहे.

  • कश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत जो दहशतवादी मारला गेला आहे. तो 95 टक्के हिजबुलचा मुख्य अधिकारी आहे. शनिवारी रात्री आम्हाला दहशतवादी संदर्भातील माहिती मिळाली होती. त्यानंतर आम्ही यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. लष्कराने केलेल्या कारवाईपैकी ही एक सर्वोत्तम कारवाई मानली जात आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यामागे देखील सैफुल।चा हात असल्याचे बोलले जात आहे.
  • शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत पाकिस्तानी लष्काराने जम्मू-कश्मीर- मधील पूंछ जिह्यात हल्ला केला. या हल्ल्यात एका शिवमंदिरासह मन्यारी, चांदवा, लोंडी आणि कठूआ या गावांत रहिवाशांच्या घरांचे नुकसान झाले आहे. टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार आणि मोर्टार डागण्यात आले. या हल्ल्यात वरील नुकसान झाले. पूंछ जिह्यातील शाहपुर, किरनी आणि कसबा सेक्टरमध्ये हा गोळीबार करण्यात आला.

डॉक्टर म्हणून होती ओळख

सैफुल्ला हा दहशतवाद्यांचा डॉक्टर म्हणून ओळखला जात होता. रियाज नायकूच्या मृत्यूनंतर हिजबुलची धुरा सैफुल्ला सांभाळत होता. पुलवामा येथील मलंगपोरा येथील रहिवाशी आहे. मुळातच डॉक्टर असल्याने तो एखाद्या धुमश्चक्रीत जखमी होणाऱया दहशतवाद्यांचा उपचार करीत असे. त्यामुळे तो डॉक्टर म्हणूनच ओळखला जात होता. काश्मीरमधील सक्रीय 10 मोस्ट वाँटेड अतिरेक्यांपैकी तो एक दहशतवादी आहे.