
बिग बॉसच्या 12 व्या सीझनमध्ये गायक अनुप जलोटा आणि अभिनेत्री जसलीन मथारू यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. या दोघांनी बिगबॉसच्या घरात एकमेकांकडे आकर्षित झाल्याचे दाखवले होते आणि नंतर दोघांचा ब्रेकअप झाल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या.
अनुप जलोटा हे जसलीनपेक्षा 37 वर्ष मोठे आहेत
जसलीनपेक्षा 37 वर्ष मोठा असलेला प्रियकर असं चित्र या रिअॅलिटी शोमध्ये रंगवून दाखवण्यात आलं होतं. दोघांमधलं प्रेम खरं होतं का, हा पब्लिसिटी स्टंट होता हे सांगणं कठीण आहे. हे दोघे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जसलीनला लग्न करायचं असून तिच्यासाठी अनुप जलोटा हेच मुलगा शोधतायत. ही बातमी स्वत: जसलीननेच दिली आहे.
जसलीनसाठी जलोटांनी दोन तरुण शोधले
जसलीनसाठी जलोटा यांनी लग्नासाठी दोन तरुण शोधले होते. एक तरुण हा कॅनडाला राहणारा होता तर दुसरा भोपाळचा राहणारा आहे. कॅनडाचा तरुण जसलीनला पसंत नसल्याने ते स्थळ पुढे सरकलं नाही. भोपाळचा मुलगा जलोटांनी शोधला, मात्र लॉकडाऊनमुळे जसलीनला त्याला भेटता आलं नाही. लॉकडाऊननंतर ते दोघे भेटणार होते, मात्र आता जसलीनला या मुलासोबतही लग्न करू नये असं वाटायला लागलं आहे.
कुंडली जुळली नाही
जसलीनने एका मुलाखतीमध्ये म्हटलंय की “अनुपजी मला नेहमी सांगत असतात की मी तुझ्यासाठी नवरा शोधेन. त्यांनी माझ्यासाठी यापूर्वी कॅनडाचा एक मुलगा माझ्यासाठी योग्य असेल असं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी माझ्यासाठी भोपाळचा एक मुलगा पाहिला होता.” लॉकडाऊननंतर या मुलाशी जसलीनने भेटायचं ठरवलं होतं. या दोघांचं बोलणंही झालं होतं, सगळी काही व्यवस्थित सुरू होतं. मात्र जसलीनने म्हटलंय की ‘असं म्हणतात की दोन चांगली माणसे एकत्र राहू शकत नाहीत.’ या दोघांची कुंडलीही जुळत नाहीये. आपल्या घरची मंडळी ही पंजाबी असून ते कुंडली जुळत नसल्याने थोडे चिंतेत होते. त्यांची चिंता पाहून मी देखील थोडीशी चिंतेत पडले होते असं जसलीनने म्हटलंय. याशिवाय इतरही काही समस्या निर्माण झाल्या होत्या ज्यामुळे जसलीनने या मुलाशी मैत्रीच्या नात्यापलिकडे न जाण्याचा निर्णय घेतलाय.
अनुप जलोटा आणि जसलीनच्या प्रेमसंबंधांच्या चर्चा गाजल्या होत्या
प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा यांनी बिग बॉसच्या घरात त्यांची शिष्या जसलीन मथारूसोबत प्रवेश केला होता. बिग बॉसच्या घरात एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या दोघांनी घराबाहेर आल्यानंतर मात्र त्यांचे नाते फक्त गुरु शिष्याचे असल्याचा दावा केला होता. आता हे दोघे पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. अनुप जलोटा व जसलीन हे त्यांचा आगामी चित्रपट ‘वो मेरी स्टूडेंट है’ मध्ये एकत्र काम करणार आहेत. जसलीनने या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते.
बिग बॉसच्या 12 व्या सीझनमध्ये दिसली होती जोडी
अनुप जलोटा हे जसलीन मथारूसोबत बिग बॉस सिझन 12 मध्ये दिसले होते. त्यावेळी त्यांनी जसलीन ही त्यांची शिष्या तसेच प्रेयसी असल्याचे भासवण्यात आले होते. जसलीन जलोटा यांच्यापेक्षा 37 वर्षांनी लहान आहे. त्यामुळे जलोटा यांना 65 व्या वर्षी लॉटरी लागल्याचे बोलत होते. त्यांना यावरून ट्रोलही करण्यात आले होते. मात्र बिग बॉसच्या घरात प्यार किया तो डरना क्या म्हणणाऱ्या जलोटा यांनी बाहेर पडताच युटर्न घेतला व जसलीन त्यांची फक्त शिष्या असल्याचे म्हटले होते.

























































