अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रातील पत्रकार संघटनांचे काय म्हणणे आहे ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी बुधवारी अटक केली. या अटकेनंतर पत्रकार संघटनांनी त्यांची भूमिका जाहीर केली आहे. पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे एस.एम देशमुख यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित त्यांची भूमिका मांडली आहे. त्यांची पोस्ट खालील प्रमाणे आहे

“रिपब्लिक टीव्ही चे संपादक अर्नब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध यासाठी करता येणार नाही की, हे प्रकरण व्यक्तीगत आहे.. त्याचा पत्रकारितेशी दुरान्वयाने संबंध नाही..त्यामुळे अर्नब यांची अटक म्हणजे चौथ्या स्तंभावरचा हल्ला वगैरे म्हणत कोणी गळे काढण्याची गरज नाही..

मे 2018 मध्ये अलिबाग तालुक्यातील कावीर येथील वास्तूविषारद अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री कुमूद नाईक यांनी आत्महत्या केली होती.. अर्नब गोस्वामी यांच्याकडून कामाची मोठी रक्कम येणे होती पण ती ते देत नसल्याने ही आत्महत्या झाल्याचे तेव्हा सांगण्यात येत होते.. गोस्वामी यांच्या विरोधात तेव्हा अलिबाग पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता पण पुढे कोणतीच कारवाई झाली नव्हती.. त्यामुळे नाईक कुटुंबियांनी या प़करणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली होती.. त्यानुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प़करण सीआयडीकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते.. त्यानुसार अलिबाग गुन्हा अन्वेषण विभागाने नव्याने चौकशी करून आज गोस्वामी यांना अटक केली..

या विषयाचा पत्रकारितेशी दुरान्वयाने देखील संबंध नाही.. दोघांच्या मृत्यूचा हा विषय असल्याने या अटकेचा निषेध उचित ठरणार नाही.. पत्रकारितेची झुल पांघरूण वाट्टेल तसे उद्योग करणारयांची पाठराखण मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती करू शकत नाही.. कायद्याला त्याचे काम करू द्यावे हेच उचित ठरेल..
अर्नब गोस्वामी यांनी पत्रकारितेचे सर्व संकेत पायदळी तुडवले असून पत्रकारिता कशी नसावी याचा नवा आदर्श जगासमोर ठेवला आहे.. त्यांची पत्रकारिता समर्थनीय नाही असे आम्हाला वाटते..”

रिपब्लिक टीव्ही चे संपादक अर्नब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध यासाठी करता येणार नाही की, हे प्रकरण व्यक्तीगत आहे…..

Posted by S. M. Deshmukh on Tuesday, November 3, 2020

महाराष्ट्रातील टी.व्ही.जर्नलिस्ट असोसिएशननेही या अटकेनंतर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. या संघटनेचे अध्यक्ष विनोद जगदाळे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की “रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी यांना झालेली अटक एका व्यक्तीगत प्रकरणातून आहे. पत्रकारीतेशी त्याचा संबध नाही. कायद्या समोर सगळे समान असतात त्यामुळे कायद्याला आपले काम करु द्या, न्याय व्यवस्थेतून सत्य जनतेसमोर येईलच. आम्ही पत्रकार म्हणून सत्या सोबत आहोत !”

vinod-jagdale-on-arnab-gosw