खारीचा वाटा – या मुलांना, या फुलांना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मीना नाईक, (लेखिका, दिग्दर्शिका, अभिनेत्री)

मी नेहमीच मुलांमध्ये रमते. कोरोना काळात मुलांवर खूपच मर्यादा आल्या. अजूनही आहेत. त्यांच्याशी ऑनलाइन संपर्कात राहून त्यांच्या मनाला उभारी देण्याचा प्रयत्न केला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुलांच्या शाळा, मित्र, खेळ, बाहेर फिरणे सगळंच बंद असल्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होताना दिसला. त्यांच्यात चिडचिडेपणा वाढला. त्यात पालकही वर्प फ्रॉम होम असल्याने त्यांनाही मुलांसाठी फार वेळ देता येत नव्हता. त्यामुळे मुलांबरोबरच पालकांनाही मार्गदर्शनाची गरज होती. या काळात पालकांनी आपल्या मुलांशी कसे वागायला हवे, त्यांना कसे समजून घ्यायला हवे आणि महत्त्वाचे म्हणजे पालक आणि मुलांमध्ये संवाद होणं किती गरजेचं आहे. त्यासाठी मी लॉकडाऊनमध्ये पालकांसाठी सहा भागांमध्ये मनातल्या गोष्टी नावाने फेसबुकवर लाइव्ह केलं. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.

मुलांशी संवाद

मुलांसोबत मी नेहमीच काम करते पण यावेळी मुद्दाम पालकांसाठी फेसबुक लाइव्ह केले होते. बऱयाचदा असं होतं की, मुलांना सांगायचे मोबाईल बघायचा नाही आणि स्वतःमात्र त्यांच्यासमोर मोबाईल बघत राहायचा हे चुकीचे आहे. तर हे सगळं मी गोष्टी रूपात सांगितले. माझा मुद्दा सांगायचा आणि नंतर त्यावरची गोष्ट सांगायची. यामध्ये पालकांनी मुलांशी कसे वागायला हवे, त्यांच्याशी संवाद कसा साधायला हवा, त्यांना काय हवंय, काय नकोय ते बघणं गरजेचं आहे. अशा सहा मुद्दय़ांवर पालकांशी संवाद साधला. मुलांना खूप गोष्टींचं कुतूहल असतं. ते तुम्हाला प्रश्न विचारतात, नेमकं त्यावेळेस आपण त्यांना सांगतो, मी माझ्या कामात आहे. आता काही विचारू नकोस. लॉकडाऊनमध्ये पालक वर्प फ्रॉम होम असल्यामुळे त्यांचीही तारेवरची कसरत होत होती, पण त्यात मुलांना जे विचारायचं असतं त्याचं पुतूहल निघून जातं. काही वेळेला मुलं पालकांना प्रश्न विचारतात आणि आई-वडिलांना त्याची उत्तरे येत नाहीत. स्वाभाविक आहे, सगळ्याच प्रश्नांची उत्तरे यायलाच पाहिजे असे नाही. पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष न करता बाळा, मला त्याचे उत्तर माहीत नाही, पण याचे उत्तर मी शोधून काढतो किंवा माझा एक मित्र आहे त्याच्याशी आपण बोलूया असे सांगून त्या मुलांना विश्वासात घ्यायला हवे किंवा आपण यूटय़ुबवर याचे काही उत्तर मिळतेय का ते बघूया. त्याला बघायला सांगायचे नाही. आपणच बघून त्यावर काय माहिती मिळतेय ते बघायचे आणि त्याला विश्वासात घेऊन तुमच्या पद्धतीने त्याला समजवायचे. असा थोडा तरी वेळ पालकांनी मुलांना दिलाच पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. त्यानंतर काही वेळा काय होतं, काही कारणानिमत्त आईवडिलांच्या बदल्या होतात. त्यावेळी त्याचा मुलांच्या मनावर काही वेळेला विस्थापित होण्याचा खूप खोलवर परिणाम होत असतो. मुलं तिथे रमतील अशा विचाराने त्यांना आपण गृहीत धरून चालतो. एका घरातून दुसऱया मोठय़ा घरात राहायला गेलो की आपण सामान कसे लावायचे, पडदे कसे लावायचे हा सगळा विचार करत असतो पण यामध्ये मुलांच्या मनावर काय परिणाम होत असतो, त्यांना काय वाटतेय, त्यांचे मित्र, त्यांची शाळा या भावविश्वात ते इतके रमून गेलेले असतात की त्यामध्ये पटकन उचलून दुसरीकडे नेलंत की त्या मुलांच्या मनात खोलवर परिणाम होतो.

गृहित धरू नका
काही मुलांच्या मनावर तात्पुरता परिणाम होतो पण काही मुलांच्या मनावर खूप परिणाम होतो. त्यांना पालकांनी गृहीत धरू नये. मुलांना विश्वासात घेऊन आपण का चाललोय हे सांगून आता तुला नवीन मित्र मिळतील हे त्यांना समजवायला हवे. आपण मोठी माणसं काय करतो की, आपण सामान गुंडाळतो आणि मुलं बिचारी मित्रांच्या आठवणीने खट्टू होऊन बसतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मी निवडल्या होत्या. त्यात माझ्या स्वतःच्या गोष्टीही होत्या. असे माझे अनुभव आणि एक एक मुद्दा घेऊन पालकांशी संवाद साधला. त्यासाठी मला फार चांगला प्रतिसाद मिळाला. सहा भाग मी केले होते. अनेकांनी अजून भाग करा सांगितले होते पण मला कोणाला बोअर करायचे नव्हते म्हणून तेवढय़ावरच थांबवले. हे मी माझ्या परीने लॉकडाऊनमध्ये केलेले चांगले काम. तसेच लॉकडाऊनमध्ये काही लोकांचे प्रबोधनसुद्धा केले.