
राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून आज दिवसभरात 11 हजार 60 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91,35 टक्क्यांवर गेले आहे.
राज्यात 5 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली असून एक लाख 2 हजार 99 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 15 लाख 62 हजार 342 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
161 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून मृत्यूचे प्रमाण 2.63 टक्के आहे. आतापर्यंत 93 लाख 18 हजार 544 लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या असून 17 लाख 10 हजार 314 पॉझिटिव्ह आले आहेत. 10 लाख 59 हजार 499 व्यक्ती होम क्वॉरंटाइन आहेत तर 8879 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाइनमध्ये आहेत.
मुंबईत दिवसभरात 792 जणांना कोरोना; 205 कोरोनामुक्त, 22 जणांचा मृत्यू
मुंबईत आज दिवसभरात 792 रुग्ण सापडले असून 205 जण कोरोनामुक्त झाले तर 22 जणांचा मृत्यू झाला. कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या आता 2 लाख 35 हजार 412 वर पोहोचली आहे.
मुंबईत 22 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 10 हजार 396 झाली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 90 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 208 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या आता 15 हजार 962 इतकी आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 15 लाख 94 हजार 599 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 2 लाख 62 हजार 476 वर पोहोचली आहे.
























































