चौदाव्या मजल्यावरून पडून पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका पाच वर्षांच्या चिमुरड्याचा 14व्या मजल्यावरून खाली पडल्याने मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे ही घटना घडली आहे. गंभीर बाब म्हणजे, या घटनेवेळी त्याचे आईवडील घरात नव्हते.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, गाझियाबाद येथील राजनगरच्या उच्चभ्रू इमारतीत राहणाऱ्या चरण दांपत्याचा तेजस्व नावाचा मुलगा शुक्रवारी घरी एकटाच होता. त्याचे आई बाबा बाहेर गेले होते. 14व्या मजल्यावरून तेजस्व खाली पडल्याचा आवाज ऐकू आला.

त्याच्या शेजाऱ्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. पण तिथे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून तपास सुरू आहे.

या प्रकरणी प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, तेजस्वची आई नर्स म्हणून काम करते, तर वडील एका खासगी कंपनीचे कर्मचारी आहेत. सध्या तेजस्वचे वडील कोरोना लॉकडाऊननंतर वर्क फ्रॉम होम करत आहेत.

शुक्रवारी संध्याकाळी ते दोघेही बाहेर गेले होते. वडील खाली सामान आणायला गेले होते, तर आई तिच्या कर्तव्यावर होती. तेजस्वने बाथरूममधून एक स्टूल घेऊन आला आणि बाल्कनीत ठेवून त्यावर उभा राहिला. उभं राहून तो खाली वाकून पाहत असताना अचानक स्टूलचा तोल गेला आणि तेजस्व चौदाव्या मजल्यावरून थेट खाली कोसळला.