रस्ता नाही तर मत नाही, बिहारमधील गावाने टाकला मतदानावर बहिष्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमध्ये आज मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडला. मात्र सौपौल जिल्ह्यातील त्रिवेनीगंज मतदारसंघातील एका सिमारिया या गावाने मात्र मतदानावर बहिष्कार घातला. या गावातून एकानेही मतदान न केल्याने मत केंद्रावर पूर्ण दिवस शुकशुकाट होता.

या गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. त्यामुळे रस्ता नाही तोपर्यंत मत नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. गावातील तब्बल पाच हजार नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातल्याने गावातील आठही बूथवर शुकशुकाट होता.

आम्ही गेली 30 वर्षे मतदान करतोय. मात्र आमच्या मागण्यांकडे लक्ष दिले जात नाही. अद्याप गावात एकही डांबरी रस्ता बांधलेला नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकलवा आहे, असे एका गावकऱ्याने सांगितले