पुण्यात नवी पेठेत विकृताकडून चिमुरडीचा विनयभंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मैत्रीणीकडे खेळण्यासाठी जाणाऱ्या एका 7 वर्षांच्या चिमुरडीचा 40 वर्षांच्या विकृताने विनयभंग केला आहे. ही घटना नवी पेठेतील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये घडली. याप्रकरणी नागरिकांनी विकृताला मारहाण केली. महेश पंढरीनाथ शिंदे (रा. नवी पेठ) असे विकृताचे नाव असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांची 7 वर्षांची मुलगी मैत्रीणीकडे खेळण्यासाठी जात होती. त्यावेळी विकृत महेशने तिला बोलावले. त्यानंतर त्याने चिमुरडीचा विनयभंग केला. ही घटना इमारतीतील काही नागरिकांच्या निर्दशनास आली. त्यांनी महेशला मारहाण केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

अल्पवयीन मुलगी मैत्रीणीकडे खेळण्यासाठी जात होती. त्यावेळी विकृताने तिला बोलावून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी तपास सुरु आहे.
– गीता पाटील, पोलीस उपनिरीक्षक, विश्रामबाग पोलीस ठाणे