पुणे – सराईत तडीपाराला समर्थ पोलिसांनी केली अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील विविध भागात घरफोडी आणि मारामारीचे गुन्हे करणाऱ्या सराईत तडीपाराला समर्थ पोलिसांनी भवानी पेठेतून अटक केले. आबिद अलीम बागवान (वय २८, रा. भवानी पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत तडीपार आबिद बागवान भवानी पेठेतील भारत टॉकीजवळ येणार असल्याची माहिती कर्मचारी सुमीत खुट्टे आणि नीलेश साबळे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आबिदला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने तडीपार असताना शहरात येण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याची कबुली दिली. ही कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते, नीलेश साबळे, सुमीत खुट्टे यांच्या पथकाने केली.