
टेम्पल रोझ रियल इस्टेट स्कीममध्ये कोट्यावधी रूपयांची फसवणूक करून तीन वर्षांपासून फरारी आरोपीला खंडणी विरोधी पथकाने अटक केले. धर्मेश नरेंद्र जोशी (रा. कळंबादेवी, मुंबई ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पल रोझ रियल इस्टेट स्कीममध्ये कोट्यावधींची अफरातफर केल्याप्रकरणी धर्मेशविरुद्ध २०१७ मध्ये चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो फरार झाला होता. काल खंडणी विरोधी पथकाला त्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार पथकाने धर्मेशला कळंबादेवी परिसरातून अटक केले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम फड, पोलीस हवालदार गुरव, शितोळे, शिनगारे, कर्णवर यांच्या पथकाने केली.
































































