
कोरोनाच्या संकटात मोठा दिलासा मिळाला असून नवीन आढळणाऱया कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांच्याही खाली आली आहे. राज्यात आज 2544 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 3 हजार 65 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 16 लाख 15 हजार 379 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणे 92.45 टक्के झाले आहे.
सध्या 84 हजार 918 कोरोनारुग्णांवर राज्यभरात विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही कमी होत असून आज दिवसभरात 60 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
मुंबईत दिवसभरात 574 जणांना कोरोना
मुंबईत आज दिवसभरात 574 रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 586 जण कोरोनामुक्त झाले. मात्र, विविध शारीरिक आजार असलेल्या 15 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.
मुंबईत 15 जणांचा मृत्यू झाल्याने एपूण मृतांची संख्या आता 10 हजार 570 झाली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची एपूण संख्या 2 लाख 45 हजार 245वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 91 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 255 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 9 हजार 956 इतकी आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 16 लाख 85 हजार 287 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 2 लाख 69 हजार 704 वर पोहोचली आहे.

























































