आजपासून पाहता येणार सावळ्या विठ्ठलाचे गोजिरे रुप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने दीपावली पाडवा व भाऊबीज निमित्त श्री विठ्ठल व श्री रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात व मंदिरामध्ये रंगीबेरंगी फुलांची सुंदर व मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे.

तब्बल आठ महिन्यानंतर आज पाडव्यापासून श्री विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून पहिल्या टप्प्यात देवाचे लांबूनच दर्शन म्हणजे मुखदर्शन दिले जाणार आहे.

vithal-rukmini-1

भाविकांनी थेट दर्शनाला न येता आधी ऑनलाइन दर्शन बुकिंग करावे लागणार आहे. दररोज ऑनलाइन दर्शन बुकिंग करणाऱ्या एक हजार भाविकांना दर्शन देण्याची व्यवस्था मंदिर समितीने केली आहे.

दर्शनाला येणाऱ्या भाविकांना मास्क, दोन भाविकांतील सहा फूट अंतर आणि सॅनिटायझरचा वापर सक्तीचा केला आहे. http://www.vitthalrukminimandir.org/home.html या वेबसाईटवर भाविकांना बुकिंग करता येईल.