रामायण, महाभारतातल्या गोष्टी ऐकून मी मोठा झालोय – ओबामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माझे बालपण इंडोनेशियात गेलेय. त्यामुळे रामायण, महाभारतातील प्रेरणादायी कथा ऐकत मी मोठा झालोय. साहजिकच हिंदुस्थान आणि हिंदुस्थानी संस्पृतीबाबत माझ्या मनात नेहमीच आदराचे स्थान राहिलेय, असा उल्लेख आपल्या ‘अ प्रॉमिस्ड लॅण्ड’ या पुस्तकात करीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी हिंदुस्थानबद्दल आपल्या नेहमीच आदराचा भाव असल्याचे स्पष्ट केले आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या ‘अ प्रॉमिस्ड लॅण्ड’ या पुस्तकाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आपल्या राजकीय प्रवासापासून ते खासगी गोष्टींपर्यंत अनेक गोष्टींवर ओबामा यांनी भाष्य केलेले पुस्तक सध्या हिंदुस्थानातही चांगलेच चर्चेत आहे. याच पुस्तकामध्ये हिंदुस्थानी काँग्रेससंदर्भात ओबामा यांनी व्यक्त केलेल्या मतांमुळे सध्या देशातील राजकारण चांगलेच तापले आहे.