
व्यवसायातून मेहनतीने कमावलेली रक्कम विश्वासाने कामगाराकडे सोपवल्याचा फटका पुण्यातील तरुणाला बसला आहे. कामगाराकेड मालकाने दिलेले 3 लाख 25 हजार रूपये चोरून पळ काढला आहे. याप्रकरणी वरूण चोप्रा (वय 34, रा. धायरी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरूण कुटूंबीयासह धायरीत राहायला आहेत. काही वर्षांपासून त्यांच्या घरात एक कामगार कामाला होता. 17 नोव्हेंबरला वरूण यांनी त्याच्याकडे 3 लाख 25 हजार रूपये ठेवण्यासाठी दिले होते. त्याचा गैरफायदा घेत कामगार पैसे घेऊन पसार झाला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. एम. निकम तपास करीत आहेत.




























































