धोका वाढतोय! राज्यात दिवसभरात 5 हजार 535 नवे रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात गेल्या चोवीस तासात एकूण 5 हजार 860 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आता कोरोनामुक्त होणाऱया रुग्णांचा आकडा 16 लाखांच्या घरात पोहचला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.79 टक्के इतके नोंदविण्यात आलेले आहे. दरम्यान, राज्यात आज दिवसभरात एकूण 5 हजार 535 रुग्णांना कोरोनाचे निदान झाले आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण 99 लाख 65 हजार 119 जणांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 17 लाख 63 हजार 055 जणांचे म्हणजेचे 17.69 टक्के जणांचे अहवाल पॉझेटिव्ह आले आहेत. तर गेल्या चोवीस तासांत एकूण 154 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यू दर 2.63 टक्के इतका नोंदविण्यात आला.

मुंबईत 924 नवे रुग्ण

मुंबईत गुरुवारी दिवसभरात 924 रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 1,192 जण कोरोनामुक्त झाले. मात्र विविध शारीरिक आजार असलेल्या 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.

मुंबईत 12 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 10 हजार 624 झाली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची एपूण संख्या 2 लाख 49 हजार 903 वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 92 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 310 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या आता 8 हजार 474 इतकी आहे.