
देशात काँग्रेसची अधोगतीकडे वाटचाल सुरू असून त्यांना पुणी माय-बापच शिल्लक राहिलेला नाही. तुम्ही मत काँग्रेसला दिले पिंवा भाजपला तरी सरकार भाजपचेच बनते असे म्हणत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसच्या भविष्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
बिहार विधानसभा आणि विविध राज्यांतील पोटनिवडणुकांतील निराशाजनक कामगिरी यावरून अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर जोरादर निशाणा साधला आहे. काँग्रेस ज्या प्रकारे कामगिरी करत आहे त्यावरून त्यांना आता देशात भविष्य नाही असे वाटते, अशी टीका केजरीवाल यांनी ‘हिंदुस्थान टाइम्स लीडरशिप समिट’ या कार्यक्रमात बोलताना केली. राज्याराज्यात लोक भाजपला कंटाळून काँग्रेसला मतदान करतात, मात्र नंतर काँग्रेसच भाजपचे सरकार स्थापन करून देते, असे ते म्हणाले.
काँग्रेसला आता पर्याय हवा
राष्ट्रीय स्तरावर आता काँग्रेसला पर्याय म्हणून कोणीतरी उभे राहायला हवे. स्थानिक पक्ष वर येऊ द्या किंवा अन्य पुणीतरी. आम आदमी पक्ष हा एक छोटा पक्ष आहे. परंतु दिल्लीत आम्ही केलेल्या विकासकामांमुळे देशातील लोक ‘आप’कडे आदराने पाहतात. देशातील जनता पर्याय नक्की देईल, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.






















































