आळंदीत 23 रुग्ण अॅक्टिव्ह, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तीर्थक्षेत्र आळंदी व पंचक्रोशीत कोरोंना रुग्ण संख्या वाढू लागल्याने याचा आळंदी कार्तिकी यात्रेवर परिणाम होणार आहे. शनिवारी ( 21) तब्बल 23 रुग्ण अॅक्टिव्ह रुग्ण आळंदीत असल्याचा अहवालातून जाहीर करण्यात आले.

आळंदीत तब्बल 23 रुग्ण अॅक्टिव्ह रुग्ण आळंदीत अॅक्टिव्ह असून शनिवारी आळंदीसह परिसरात 5 रुग्ण वाढले. यात मरकळ, चिंबळी, चऱ्होली खुर्द चा समावेश आहे. आळंदीत मात्र अॅक्टिव्ह रुग्ण संख्या एकने वाढुन 23 झाली आहे. आळंदीत कोरोना रुग्ण वाढत आहेत. आळंदीकरांनी अधिक दक्षता घेण्याचे आवाहन आळंदी मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी केले आहे.

अॅक्टिव्ह रुग्ण आळंदीत वाढ होताना दिसत आहेत. आत्ता पर्यंत आळंदीतील 14 रुग्णांचे निधन झाले. एकुण 929 रुग्ण बरे होऊन घरी सुखरुप पोहचले आहेत. आता पर्यंत आळंदीत एकूण 966 रुग्ण होते. खेड तालुक्यात 107 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. खेड तालुक्यात शनिवारी 21 रुग्ण आढळले आहेत. तर 12 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडले. 203 रूग्णांचे खेड तालुक्यात निधन झाले आहे. आळंदी पंचक्रोशीत रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले असून मास्क न

वापरणाऱ्यांवर दंडाची कारवाई आळंदी पोलीस व आळंदी नगरपरिषद प्रशासन करीत आहे. सुरक्षिततेसाठी नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी केले आहे.