देशात गेल्या काही दिवसांपासून लव जिहादवर वाद सुरू आहे. त्यात मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश सरकारने यावर कायदा आणण्याची तयारी केली आहे. यावर खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली असून आधी संविधान वाचा असे म्हटले आहे.
It’ll be gross violation of Articles 14 & 21, scrap Special Marriage Act then. They should study Constitution. Such propagation of hatred won’t work. BJP doing drama to distract youth who fell victim to unemployment: Asaduddin Owaisi, AIMIM on anti-‘Love Jihad’ law by some states pic.twitter.com/lDnwrWPbA4
— ANI (@ANI) November 22, 2020
ओवेसी म्हणाले की, लव जिहाद कायदा बनवणे हे संविधानाच्या कलम 14 आणि 21 च्या विरोधात आहे. या कायद्यामुळे विशेष विवाह कायद्याचे महत्त्व संपुष्टात येण्याची शक्यता आहे. कायदा बनवण्यापूर्वी त्यांनी संविधान वाचावे असे ओवेसी म्हटले आहे. तसेच भाजप नागरिकांमध्ये द्वेष पसरवत असून तरुणांचे लक्ष रोजगारापासून दुसरीकडे हटण्याचे हे कारस्थान असल्याचे त्यांनी म्हटले.
उत्तर प्रदेशमध्ये 10 वर्षाची शिक्षा
उत्तर प्रदेशमध्ये लव जिहाद विरोधात कायदा बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यात या कायद्याचे उल्लंघन केल्यास 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. तर मध्य प्रदेशमध्येही हा कायदा बनवण्यात येणार असून 5 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे.



























































