राज्यात सध्या तरी पुन्हा लॉकडाऊन पुकारण्याची गरज नाही. मात्र काही लोकांची बेफिकिरी वृत्ती पाहिली तर छोटय़ा प्रमाणात काही निर्बंध घालण्याचा सरकारचा निश्चितच विचार आहे. त्याबाबतची नियमावली तयार करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
कोरोनाबाबत देशातील इतर राज्यांशी तुलना केल्यास महाराष्ट्रातील परिस्थिती निश्चितच समाधानकारक आहे. त्यामुळे राज्यात सध्या तरी लॉकडाऊन पुकारण्याची गरज नाही असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील चाचण्यांचे प्रमाण आता परत वाढविण्यात येणार आहे. आता टार्गेटेड टेस्टिंग करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱयांना देण्यात येणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले.
लसीकरणाच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली आहे. देशात सध्या पाच लसींवर काम सुरू आहे. मात्र लस नेमकी कोणत्या तारखेला उपलब्ध होईल हे आज तरी ठामपणे सांगता येणार नाही. लसीकरणाचा कार्यक्रम हा पेंद्र सरकारच्या माध्यमातूनच राबविण्यात येईल. पेंद्राने लसीकरणाबाबतचा प्राधान्यक्रमही त्यात आरोग्यसेवक, पोलीस, 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती, 50 पेक्षा कमी वयाच्या व्यक्ती ज्यांना सहव्याधी आहेत अशा सुमारे 30 कोटी लोकांचे प्राधान्यक्रमाने लसीकरण करण्यात येणार असल्याचेही टोपे
यांनी सांगितले.




























































