साकीनाकामध्ये सिलिंडरच्या स्फोटात एकाचा मृत्यू; 5 जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रतिकात्मक छायाचित्र

साकीनाका येथे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एका 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तर एकाच कुटुंबातील 5 जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेतील जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

साकीनाका येथील जरीमरी जगताप इस्टेट बाजूला असलेल्या जगताप वाडीतील अनंत भुवन चाळीत एका घरात अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत जखमी झालेल्या 6 जणांना उपचारासाठी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनिसा खान (45), अस्मा (60), रिहान (8), सानिया (14), शिफा (16) अशी जखमींची नावे आहेत. तर अलमस (15) हिचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य खात्याकडून देण्यात आली.