
मंगळ ग्रहावर जीवसृष्टी असल्याचा दावा जगभरातील शास्त्र्ाज्ञ करत आहेत. यावरचे संशोधन अद्याप सुरू आहे. अशातच मंगळ ग्रहावर चार अब्ज वर्षांपूर्वी महाभंयकर पूर आला होता, असे एका अभ्यासातून दिसून आले आहे. एका उल्कापिंडमुळे हा विनाशकारी पूर आल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
गेली कित्येक दशके मंगळ ग्रहाने संशोधकांना व्यस्त ठेवले आहे. मंगळाबाबत नवनवीन दावे सतत केले जात असतात. मंगळवार पृथ्वीसारखी जीवसृष्टी असल्याचा दिशेने संशोधन सुरू आहे. आताही जॅक्सन स्टेट युनिव्हर्सिटी, कॉर्नेल युनिव्हर्सिटी, जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरी आणि युनिव्हर्सिटी ऑफ हवाई या संस्थांच्या संशोधकांच्या हाती थक्क करणारे निष्कर्ष आले आहेत. त्यातूनच मंगळ ग्रहावर भीषण पूर आल्याचे समजलंय. क्युरोसिटी रोव्हरला मिळालेल्या सेडीमेंटोलॉजिकल डेटाच्या आधारे पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या पुराची माहिती मिळाल्याचे संशोधक अल्बर्टो जी फाईरान यांनी सांगितले आहे.


























































