
‘हिमालय’ पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर पालिकेने पुलांची दुरुस्ती आणि नवीन पुलांची बांधणी वेगाने सुरू केली आहे. यामध्ये आतापर्यंत 184 छोटय़ा दुरुस्तीपैकी 70 कामे पूर्ण झाली असून 48 पुलांची मोठी दुरुस्तीही वेगाने सुरू आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये अतिधोकादायक ठरलेले 29 ब्रीज पाडून नव्याने बांधण्यात येत आहेत. पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेली पुलांची कामे पावसाळ्यापूर्वी सुरू होतील अशी माहिती पालिकेचे प्रमुख पूल अभियंता राजेंद्रपुमार तळकर यांनी दिली.
‘हिमालय’ पूल दुर्घटनेनंतर 314 पैकी 296 पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. यामध्ये 29 पूल अतिधोकादायक असल्याचा अहवाल देण्यात आला. तर 106 पुलांची छोटी दुरुस्ती आणि 87 पुलांची मोठी दुरुस्ती सुचवण्यात आली. तर 77 ब्रीज ‘गुड पंडिशन’मध्ये असल्याचा अहवाल देण्यात आला. मोठय़ा 87 दुरुस्तीपैकी 48 कामे हाती घेण्यात आली असून यातील 14 कामे आतापर्यंत पूर्ण झाली आहेत. तर इतर कामेही वेगाने सुरू आहेत.
मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून पुलांच्या सुरक्षेला महत्त्व दिले जात आहे. मुंबईत एपूण 314 पूल आहेत. यामध्ये मुंबई शहर विभागात 81, पूर्व उपनगरात 90 आणि पश्चिम उपनगरात 143 पूल आहेत. यामध्ये 23 स्कायवॉक एमएमआरडीएने पालिकेकडे हस्तांतरित केले आहेत.
अशी सुरू आहेत कामे
शहर विभागात हँका@क ब्रीज, कनार्प ब्रीज, महालक्ष्मी स्टेशन ब्रीज – दक्षिण व उत्तर, माहीम का@जवे पुनर्बांधणी-रुंदीकरण अशी महत्त्वाची कामे सुरू असून पश्चिम उपनगरात कोरापेंद्र बोरिवली ब्रीज, मृणालताई गोरे पूल, अंधेरी गोखले ब्रीज, जुहू तारारोड ब्रीज, धोबी घाट, मेघवाडीनाला, पीरामल नाला, रतनगर इत्यादी महत्त्वाची कामे सुरू आहेत.
पूर्व उपनगरातील महत्त्वाच्या कामांपैकी नीलकंठ पूल, बर्वेनगर पूल, हरीतनाला पूल, रेनीसन्सजवळील पादचारी पूल, वीर संभाजनगर मुलुंड पूल, लक्ष्मीबाग नाल्यासह घाटकोपर ब्रीज, विद्याविहार ब्रीज, मानखुर्द सहापदरी पुलांचे काम वेगाने सुरू आहे.
यामध्ये विक्रोळी रेल्वे पुलाच्या कामात गोदरेज व गामाडिया ट्रस्टच्या जागेचा प्रश्न आणि एन, एस विभागांतर्गत येत असणारी काही बांधकामे हटवल्यानंतर हे कामही पूर्ण होणार आहे. तर मुलुंड नाहूर रोड ओव्हर ब्रीजचे पालिकेचे 30 टक्के काम पूर्ण झाले आहे.





























































