
पत्नीने विष घेऊन आत्महत्या केल्यानंतर पतीने देखील गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. परळीत ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पती पत्नीने अचानक हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत पोलीस तपास सुरू आहे.
परळीच्या पांगरी कॅम्प इथली ही घटना आहे. पत्नीने आत्महत्या केल्यानंतर पतीनेही आत्महत्या केली. प्रियंका पंडित आणि सायस पंडित अशी आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्यांची नावं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीने विष घेऊन तर पतीने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे.
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेत दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर दोघांनीही आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समोर आलं नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

























































