कोकण रेल्वेला मराठीचा पडला विसर, मराठी भाषा विभागाने विचारला जाब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकण रेल्वेला त्रिभाषा सूत्राचा विसर पडला असून कोकण रेल्वे प्रसिद्धीपत्रके, जाहिराती आणि फलकांवर मराठीचा वापर करीत नसल्याच्या तक्रारी आल्याने कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकांना राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाने जाब विचारला आहे.

कोकण रेल्वेने पेंद्र शासनाच्या त्रिभाषा सूत्रानुसार आपल्या कार्यालयीन कामात इंग्रजी व हिंदीबरोबरच राज्याच्या प्रादेशिक मराठी भाषेचा वापर करणे कायद्याने बंधनकारक आहे. असे असताना कोकण रेल्वेची प्रसिद्धीपत्रके, जाहिराती, फलकांवर तसेच समाजमाध्यमांवरही मराठीचा अंतर्भाव नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते अक्षय महापदी आणि आनंदा मारुती पाटील यांनी ‘आपले सरकार’ प्रणालीवर केली आहे. या चुकीबद्दल तेथील अधिकाऱयास व मराठी भाषा स्थानिक संचालकास शासन करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. याची गंभीर दखल घेत भाषा विभागाने ‘कोरे’ला खुलासा करण्यास सांगितले आहे.