नाशिककर गारठले, पारा 10 अंशांवर घसरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या पाच दिवसांपासून पुन्हा नाशिकच्या तापमानात घट होण्यास सुरूवात झाली आहे. शनिवारी 11.1 तर आज रविवारी 10.1 अशी किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नाशिक शहर आणि निफाडच्या कुंदेवाडी येथे रविवारी किमान तापमानाचा पारा 10 अंशांवर घसरला. यामुळे थंडीचा कडाका वाढला असून, दिवसाही वातावरणात गारवा जाणवत आहे.

दिवाळीच्या दरम्यान 12 नोव्हेंबरला या हंगामातील नीचांकी तापमान नोंदवले गेले होते. त्यानंतर तापमानात वाढ होत थंडी गायब झाली होती. आता गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुन्हा नाशिक जिल्ह्यातील तापमानात घट होण्यास सुरूवात झाली आहे. नाशिक शहरात शुक्रवारी 14, शनिवारी 11.1 तर आज रविवारी 10.1 किमान तापमानाची नोंद करण्यात आली. निफाडला शुक्रवारी 10.6, काल 11.1 आणि आज रविवारी 10 अंश सेल्सिअस इतके तापमान होते.