
आपल्या आवडीचा पदार्थ खाण्यासाठी आपण आसपासचे हॉटेल शोधून जिभेचे चोचले पुरवतो. रशियातल्या एका उद्योगपतीने मात्र आपल्या आवडीचा बर्गर खाण्यासाठी चक्क हेलिकाॅप्टर बुक करून 362 किलोमीटरचा प्रवास केला आहे. विक्टर मार्टिनोव्ह असे या 33 वर्षीय उद्योगपतीचे नाव असून त्यांचा प्रायव्हेट याटचा व्यवसाय आहे. सध्या ते क्राईमियामध्ये आपल्या गर्लफ्रेंडसोबत हॉलिडेला गेले होते. या दरम्यान त्यांना बर्गर खाण्याची इच्छा झाली. परंतु आसपास त्यांना कोणतेही हॉटेल आवडले नाही. मग कसलाही विचार न करता त्यांनी दोन लाख रुपये खर्च करून दोन तासांसाठी हेलिकाॅप्टरचे बुकिंग केले. अन् गर्लफ्रेंडला घेऊन 362 किमी अंतरावर असलेल्या मॅक्डोनाल्डमध्ये पोहोचले. यापूर्वी केवळ बर्गर खाण्यासाठी हेलिकाॅप्टरचे बुकिंग कधीही झाले नसल्याचे हेलिकाॅप्टर भाडय़ाने देणाऱया कंपनीने सांगितले आहे.

























































