
>> नीलेश कुलकर्णी, [email protected]
‘थलावाई’ नावाने प्रसिद्ध असलेले तामीळ सुपरस्टार रजनीकांत यांनी तामीळ जनतेला ‘वड्डकम’ म्हणत अखेर तामीळनाडूच्या राजकीय मंचावर आपली एंट्री केली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी ते नव्या राजकीय पक्षासह तामीळनाडूच्या राजकारणात पाय ठेवतील. तामीळनाडूचा चेहरामोहरा बदलण्याचा आणि जातीधर्मविरहित राजकारण करण्याचा संकल्प रजनीकांत यांनी केला आहे खरा, मात्र रजनीकांत यांची ही ‘मात्रा’ कितपत चालणार, हा प्रश्नच आहे. अभिनयाच्या क्षेत्रातून आलेल्या रामचंद्रन, जयललिता आणि पटकथा लेखक असलेल्या करुणानिधी या तिन्ही करिश्माई नेत्यांनी तामीळ राजकारण आपल्याभोवती कायम फिरवत ठेवले होते. ही समृद्ध परंपरा रजनीकांत पुढे कायम राखतात का, ते लवकरच कळेल.
जयललिता आणि करुणानिधी या दोन दिग्गज नेत्यांच्या निधनामुळे तामीळनाडूचे राजकारण खऱया अर्थाने पोरके झाले आहे. ही ‘स्पेस’ भरून काढण्यासाठी दिल्लीतील सत्ताधीशांनी जोरकस प्रयत्न करून पाहिले. जयललितांच्या निधनानंतर जयललितांच्या मैत्रीण शशिकलाबाईंना तुरुंगात डांबून संपूर्ण अण्णा द्रमुकच खिशात टाकण्याचा भाजपने प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी झाला नाही. पेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तामीळनाडूचा नुकताच दौरा करत द्रमुकच्या भ्रष्टाराचाविरोधात डरकाळी पह्डली आणि त्यानंतर लगेच रजनीकांत यांनी वड्डकम करत राजकीय पक्षाची घोषणा केली. वास्तविक, जयललिता व करुणानिधी यांची स्पेस भरून करण्यासाठी रजनीकांत यांना गेल्या काही वर्षांपासून प्रोजेक्ट केले जात आहे आणि त्यामागे भाजपचेच डावपेच आहेत हे आता उघड झाले आहे. अण्णा द्रमुक, रजनीकांत व भाजपची मोट बांधून तामीळनाडूच्या सत्ताकारणात शिरकाव करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठीचा चेहरा आणि मोहरा म्हणून रजनीकांत काम करतील अशी चिन्हे आहेत. तामीळनाडूचे उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनीही रजनीकांत यांच्याशी राजकीय आघाडीची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणारी तामीळनाडूची निवडणूक रंजक ठरणार आहे. कमल हसन नावाचे दुसरे एक सुपरस्टारही तामीळ राजकारणात सक्रिय आहेत. मात्र त्यांची दखल घेण्याइतपतही बस्तान बसलेले नाही. एक अभिनेता म्हणून जनता तुम्हाला डोक्यावर घेईलही, मात्र तीच जनता नेता म्हणून डोक्यावर घेईलच याची शाश्वती नाही. सिनेमातले ‘थलावाई’ राजकीय रंगमंचावरचे थलावाई ठरतात का ते पुढचे वर्ष ठरवेल.
शेतकरी आंदोलन अन् मंत्र्यांचा बेताल…
तिन्ही कृषी कायद्यांविरोधात राजधानीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱयांनी रण पेटवले आहे. दिल्लीत गेल्या पंच्याहत्तर वर्षांत पडली नाही इतकी कडाक्याची थंडी पडली आहे. अशा गोठविणाऱया थंडीत केंद्र सरकारच्या दंडुक्याचा मार आणि पाण्याचे फवारे झेलत शेतकरी आपल्यापरीने लढत आहेत. मात्र शेतकरी आंदोलनाबद्दल सहानुभूती ठेवणे तर दूर, या आंदोलनाची टिंगलटवाळी करण्याचा सुनियोजित कार्यक्रम भाजपने हाती घेतल्यासारखी स्थिती आहे. केंद्र सरकारातले मंत्री आणि भाजपचे नेते या आंदोलनाविषयी वाटेल ते बरळताना दिसत आहेत. ज्यांच्या अंबाला या मतदारसंघातून शेतकरी आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला, त्या रतनलाल कटारिया या केंद्रीय मंत्र्यांनी आंदोलन करणारे शेतकरी वाटत नाहीत असा जावईशोध लावला तर लष्करप्रमुख असतानाही वेगवेगळय़ा कारणांमुळे कायम वादग्रस्त राहिलेल्या व्ही. के. सिंग यांनी शेतकऱयांच्या पेहरावावरून या आंदोलनावर टीका केली. जे. पी. दलाल हे महाशय हरयाणा सरकारातले पृषीमंत्री आहेत. शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान व चीनचा हात असल्याचे नवे संशोधन त्यांनी पुढे आणले आहे. भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी या आंदोलनामागे ‘टुकडे टुकडे गॅंग’चा हात असून ‘शाहीन बाग’सारखे हे आंदोलन पेटविण्याचा समाजपंटक कट करत असल्याचा शोध लावला आहे. शेतकऱयांच्या आंदोलनाकडे पाहण्याची भाजपची मानसिकता यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे. दिल्लीच्या सीमांवर शेतकरी धडकेपर्यंत शेतकऱयांची दखल सरकारने घेतली नाही. भाजप नेत्यांनी शेतकऱयांबद्दल सहानुभूती नाही दाखविली तरी चालेल, मात्र त्यांची थट्टा तरी उडवू नका!
अहमद पटेल यांची ‘कर्तव्यनिष्ठा…’
काँग्रेसचे चाणक्य मानल्या जाणाऱया अहमद पटेल यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. पटेल यांच्या सक्रियपणाच्या कथा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात दंतकथांसारख्या प्रसिद्ध आहेत. पटेल यांचा दिवस सायंकाळी सुरू व्हायचा आणि सकाळी संपायचा. राष्ट्रीय राजकारणातल्या पडद्याआडच्या घडामोडींना ते रात्रीच मूर्तरूप देत असत. कोरोनाने गाठलेले असतानाही पटेल यांची सक्रियता कमी झाली नव्हती. त्याबाबतची रंजक माहिती हाती लागली. ऑक्टोबरमध्ये कोरोनाचे निदान झाल्यानंतर पटेल यांनी स्वतःहून आपल्या जवळच्या मित्राच्या गाझियाबादच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला. तब्येत ढासळू लागल्याने त्यांना गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. मात्र अशा वेळीही त्यांचे दोन मोबाईल पह्न सुरू होते. एक पह्न केवळ सोनिया व राहुल गांधी यांच्यासाठी तर दुसरा फोन सर्वांसाठी. शेवटचा श्वास घेईपर्यंत अहमद पटेल यांचे हे दोन्ही पह्न कधी बंद झाले नाहीत. पटेल जीवनमरणाची लढाई लढत असताना बिहारच्या राजकारणात दररोज नवनवीन पेच निर्माण होत गेले. त्यावेळी काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांच्यात सामंजस्य निर्माण करण्यात पटेलांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सीमांचल या मुस्लिमबहुल भागात उमेदवारीवरून काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलात धुसफूस सुरू झाली. त्यावर पटेलांनी हॉस्पिटलमधून तोडगा काढला. बिहारचे निकाल आले. काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. त्यानंतर दुर्दैवाने पटेलांचे निधन झाले. मात्र आता त्यांच्या ‘कमिटमेंट’ची सर्वत्र चर्चा सुरू आहे. अहमद पटेल नावाच्या गूढ व्यक्तिमत्त्वाचे गारूड दिल्लीच्या राजकारणाने अनुभवले. अशा कमिटेड नेत्यांमुळे कोणताही राजकीय पक्ष बळकट होत असतो हेच खरे!






























































