प्रभू रामचंद्र हे शौर्याचे प्रतीक, सीताहरणाच्या वादग्रस्त विधानाबाबत सैफने मागितली माफी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीताहरणाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे अभिनेता सैफ अली खान चांगलाच ट्रोल झाला होता. हा वाद उफाळल्यानंतर अखेर सैफने माफी मागितली असून पुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मी माझे विधान मागे घेतो, असे त्याने म्हटले आहे.

सैफ आगामी काळात ‘आदिपुरुष’ या चित्रपटात झळकणार आहे. रामायणावर हा चित्रपट आधारित असून यात सैफ रावणाची भूमिका साकारणार आहे. रावणाला आजवर आपण खलनायकाच्या भूमिकेत पाहिले आहे, मात्र तो खलनायक नव्हता. रावणाची बहीण शूर्पनखेचे नाक लक्ष्मणाने कापले होते. त्याचा बदला म्हणून रावणाने सीतेचे हरण केले. या चित्रपटातून रावणाचे दयाळू आणि मानवतावादी रूप प्रेक्षकांसमोर मांडणार आहोत, असे वादग्रस्त विधान त्याने केले होते. या वक्तव्यामुळे रावणाच्या भूमिकेचे उदात्तीकरण केल्याचा आरोप सैफवर झाला होता. ‘बॉयकॉट आदिपुरुष’ हा हॅशटॅश दिवसभर ट्रेंडिंगमध्ये होता.