
दहशत माजविण्यासाठी दुकानादाराला कोयत्याने धाक दाखवून परिसरातील पाच वाहने फोडणाऱ्या आठजणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केले. दोन दिवसांपुर्वी रात्री पावणेनउच्या सुमारास आंबेगाव बुद्रुक परिसरातील स्वामी सदन सोसायटी समोरील रस्त्यावर ही घटना घडली.
तुषार मधुकर डिंबळे (वय 23), निखील सखाराम आखाडे (वय 24), अविनाश रामदास महामुनी (वय 29), अजिंक्य रामदास काळे (वय 20), विशाल विष्णू कांबळे (वय 24), यश प्रशांतसिंग साहोता (वय 21), दीपक किसन तोरमकर (वय 20), अमोल ज्योतिबा कांबळे (वय 25, सर्व रा.आंबेगाव पठार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याबरोबर असलेल्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.
आंबेगाव बुद्रूकमध्ये दहशत माजविण्यासाठी टोळके हातात कोयते घेउन आले होते. त्यांनी एका दुकानादाराला कोयत्याचा धाक दाखवून दुकान बंद करायला लावले. त्यानंतर परिसरातील पाच वाहने फोडून दहशत पसरविली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार तपास करत आहेत.























































