बॉलिवूडमध्ये घबराट, प्रसिद्ध अभिनेत्रीला झाली कोरोनाची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता वरूण धवन व ज्येष्ठ अभिनेत्री नितू कपूर यांना चित्रपटाच्या सेटवर कोरोनाची लागण झाल्यानंतर आता अभिनेत्री कृती सेनन देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. कृती चंदिगढमध्ये अभिनेता राज कुमार रावसोबत शूटींग करत होती. त्या दरम्यान तिचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

kriti-1

कृतीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले असले तरी तिच्यावर कोणत्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत किंवा ती कुठे क्वारंटाईन झाली आहे याबाबत काहीच समजलेले नाही. मात्र कृतीची तब्येत स्थिर असल्याचे समजतेय. कृती सेनन

सोमवारी सकाळी छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दिव्या भटनागर हिचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिव्या ही 34 वर्षांची होती. तिच्या लग्नाला अद्याप वर्ष देखील झाले नसून येत्या 15 दिवसात ती लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार होती.