
काही कायदे जुने आहेत. या कायद्यांचे ओझे झाले असून, त्यामुळे त्यात बदल, सुधारणा आवश्यक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आग्रा मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. जुने कायदे असतील तर नवीन शतक आपण उभारू शकत नाही, असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदींचे हे वक्तव्य सूचक मानले जात आहे. विकासासाठी सुधारणा आवश्यक आहे. नवीन सुविधा देण्यासाठी नव्या पद्धतीने रचना केली पाहिजे. काही कायदे मागील शतकासाठी चांगले होते; पण वर्तमानकाळात ते ओझे बनले आहेत. त्यामुळे जुन्या कायद्यांच्या आधारे नवीन शतक उभारले जाऊ शकत नाही. सुधारणा ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, असे ते म्हणाले.
























































