डेटिंग अॅप्लिकेशन वापरताय? मग ही बातमी तुमच्यासाठीच…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

स्मार्टफोनच्या जमान्यात अनेक गोष्टी व्हर्चुअल झाल्या आहेत. त्यात शिक्षण, अन्न, खरेदीपासून ते नातेसंबंधांचाही समावेश आहे. पण, तंत्रज्ञानाचे जितके फायदे आहेत, तितके तोटेही आहेत. काही अॅप्लिकेशनमधून वैयक्तिक माहिती लीक होत असल्याचं वृत्त आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, काही लोकप्रिय डेटिंग अॅप्लिकेशनमधून युजर्सची माहिती लीक होत असल्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे अशी अॅप्लिकेशन  वापरणाऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कारण या अॅप्लिकेशन्समध्ये CVE 2020 8913 हा बग शिरला आहे, अशी माहिती काही तंत्रज्ञांनी दिली आहे. खरंतर एप्रिल महिन्यातच ही त्रुटी दूर झाल्याचं गुगलतर्फे सांगण्यात आलं होतं.

पण, तरीही अनेक अॅप्लिकेशनमध्ये हा बग दिसत आहे. काही तंत्रज्ञांच्या म्हणण्यानुसार सायबर हल्लेखोर या अॅप्लिकेशन्समध्ये काही धोकादायक कोड टाकू शकतील. त्यामुळे युजरची वैयक्तिक माहिती लीक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही अॅप्लिकेशन वापरताना खबरदारी घेण्याची सूचना तंत्रज्ञांनी दिली आहे.

कोणते आहेत ते अॅप्स

अशा प्रकारच्या अॅप्लिकेशनमध्ये बहुतांश डेटिंग अॅप्सचा समावेश आहे. बम्बल, ओकेक्युपिड, सिस्को टीम्स आणि ग्रिंडर अशांसारखे डेटिंग अॅप्स सायबर हल्लेखोरांच्या निशाण्यावर असतील. हल्लेखोरांनी जर कोड टाकण्यात यश मिळवलं तर त्या कोडच्या साहाय्याने ते तुमच्या अॅप्लिकेशनचा ताबा मिळवू शकतात.