
अभिनेता सुशांत राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्जचा अँगल तपासताना अभिनेत्री रिया चक्रवतींचा भाऊ शोविक चक्रवर्ती याला विशेष एनडीपीएस न्यायालयाने ड्रग्ज ट्रफिकिंगप्रकरणी क्लीन चिट दिली आहे. शोविककडे कोणतेही ड्रग्ज प्रत्यक्षात सापडले नाही. त्यामुळे त्याच्यावर ड्रग्ज ट्रफिकिंगचा खटला चालवणे चुकीचे ठरेल असा निर्वाळा देत त्याला याप्रकरणी क्लीन चिट दिली आहे. 3 महिने तुरुंगात काढलेल्या शोविकला याच न्यायालयाने नुकताच जामीन दिला आहे. 28 दिवस तुरुंगात काढल्यानंतर रियाला न्यायालयाने एनसीबी दाखल केलेल्या खटल्यात जामीन दिला होता, तर शोविकचा जमीन अर्ज फेटाळला होता. अखेर शोविकलाही जामीन मंजूर केला.
सुशांत राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय, एनसीबी आणि ईडी या तीन सरकारी तपास यंत्रणा करीत आहेत. रिया चक्रवर्तीचा जामीन मंजूर करताना मुंबई उच्च न्यायालयाने ड्रग्ज ठेवण्याचा अर्थ त्या व्यक्तीचा ड्रग्ज तस्करीशी संबंध आहे असा होत नाही. त्यामुळे एनडीपीएस ऍक्टच्या कलम 27 ए नुसार खटला चालवू शकता नाही असे म्हटले होते. याच निर्णयाचा आधार घेत विशेष एनडीपीएस न्यायालयाने शोविकला जामीन दिला होता.































































