
शुक्रवारी सकाळी मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना विस्कळीत वाहतुकीचा सामना करावा लागत आहे. माटुंगा सर्कलनजीक एका ट्रॅव्हलर बसला अपघात झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
माटुंगा सर्कलनजीक एक ट्रॅव्हलर बस दुभाजकाला आपटली आणि दुसऱ्या मार्गिकेत शिरली. त्यामुळे मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक खोळंबली असून माटुंगा पुलावर गाड्यांची गर्दी झाली आहे.





























































