Video – कृषी कायद्याविरोधात चंद्रपुरात टोल फ्री आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने आणलेल्या वादग्रस्त कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चंद्रपुरातील सामाजिक संघटनांनी नागपूर-हैद्राबाद महामार्गावर विसापूर टोल नाक्यावर आंदोलन केले. शेतकरीविरोधी कायदे केंद्र सरकारने मागे घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.

आज देशव्यापी टोल फ्री आंदोलन पुकारण्यात आले होते. त्यानुषंगाने आज सकाळी 11 वाजता चंद्रपुरात हे आंदोलन करण्यात आले. किसान आंदोलन समिती व जनविकास संघटना यांच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आले.

प्रारंभी चंद्रपूर ते विसापूर टोल नाक्यापर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली. आणि नंतर टोल नाक्यावर फलक झळकावत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महामार्गावरुन धावणाऱ्या जड वाहनांना कोणताही टोल न आकारता सोडण्यात आले. अर्धा तास हे आंदोलन चालल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.