नाशिकमध्ये तळ्यात बुडून सुरक्षारक्षकाचा मृत्यू 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिन्नर तालुक्यातील दातली शिवारातील एका तलावात बुडून काल सुरक्षारक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिकच्या उपनगरचे प्रकाश जयवंत दिवे (45) हे दातली शिवारात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. ते शनिवारी दुपारी दातली शिवारातील पाटबंधारे खात्याअंतर्गत असलेल्या तलावाच्या पाण्यात बुडाले.

आसपासच्या ग्रामस्थांनी त्यांना पाण्याबाहेर काढत उपचारासाठी सिन्नर नगरपालिकेच्या रुग्णालयात नेले. वैद्यकीय अधिकाऱ्य़ांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. ज्ञानेश्वर छबू जावरे यांनी दिलेल्या माहितीवरून सिन्नर एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.