लोकल बंदमुळे घरविक्रीत 60 टक्के घट, 99 एकर्सचा अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविड काळात मुंबई आणि नवी मुंबईतील घरांची स्थिती काय होती याचा अभ्यास ‘99 एकर्स’ या संस्थेने केला आहे. बांधकाम पुन्हा सुरू झाले, विकासकांनी मुद्रांक शुल्क कमी केले आणि सोयिस्कर पेमेंट स्कीममुळे घरांच्या चौकशीत 45 टक्के वाढ झाली. मात्र लोकल बंद असल्यामुळे दर महिन्याच्या घरविक्रीत 60 टक्के घट झाल्याचे 99 एकर्सच्या अहवालात म्हटले आहे.

एकूणच आर्थिक अनिश्चितता वाढल्याने व्यवहार रद्द करण्याचे प्रमाणदेखील 10 ते 15 टक्क्यांनी वाढले. अनेक विकासकांनी नवे प्रकल्प जाहीर केले नाहीत किंवा अनिश्चित काळासाठी स्थगित केले आहेत. जुलै-सप्टेंबरमध्ये मात्र रियल इस्टेटने उभारी घेतली आणि पुन्हा विक्रीत अडीचपट वाढ झाल्याचे मुख्य व्यवसाय अधिकारी मनीष उपाध्याय यांनी सांगितले.