
फ्लॅट नावावर करण्याच्या आणि घरगुती कारणांवरून मुलगा आणि सुनेने मिळून आई-वडिलांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चाकणच्या बलुतं आळीमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी मुलगा आणि सूनेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण शेखर तोडकर, अमृता किरण तोडकर (दोघे रा. खालूंब्रे, ता.खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सुमन शेखर तोडकर (वय 55, रा. श्रीपूर्णा कॉम्प्लेक्स, बलुतं आळी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून सुमन आणि त्यांचे पती शेखर तोडकर यांना घरगुती आणि फ्लॅट वाटणीच्या कारणावरून शिवीगाळ करून दमदाटी केली. सून अमृता हिने सुमान यांचे केस धरून पायावर लाथ मारून गुडघा फ्रॅक्चर केला. याबाबत मुलगा आणि सुनेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.


























































