
शीतल आमटेंच्या आत्महत्येनंतर 13 दिवस पूर्ण होताच त्यांचे पती गौतम करजगी आणि मुलगा शर्किल यांनी आनंदवनाचा निरोप घेतला आहे. महत्काचे म्हणजे आता गौतम आणि शर्किल हे आनंदवनात परत येणार का? यावरही प्रश्नचिन्ह आहे. कारण आता आमची गरज आहे का? हे आम्हाला नाही तर आनंदवनाला ठरवायचंय’ अशी भूमिका गौतम करजगी यांनी घेतल्याचे कळतंय. विशेष म्हणजे समाजाला इतके भरभरून दिलेल्या, हजारो लोकांना जगण्याचे बळ देणाऱया आनंदवनात आमटे परिवारातील शीतल यांची आत्महत्या आणि परिवारातील ताटातूट ही दुर्दैवीच म्हणावी लागेल.



























































