
ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या ऍडलेड कसोटीत टीम इंडियाच्या खेळाडूंनी खराब क्षेत्ररक्षण केले. पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या पृथ्वी शॉ यानेही अगदी सोप्पा झेल सोडला. ऑस्ट्रेलियाचा खमक्या फलंदाज मार्नस लाबुशेन याचा झेल पृथ्वीने सोडला आणि यामुळे कर्णधार विराट कोहली भडकला.
ऑस्ट्रेलियाच्या डावातील 23 वे षटक टीम इंडियाचा वेगवाग गोलांदाज जसप्रीत बुमराह याने टाकले. या षटकात स्ट्राईकवर असलेल्या मार्नस लाबुशेन याने शॉर्ट चेंडूवर पूल शॉट मारला. चेंडू थेट पृथ्वीकडे गेला, मात्र त्याला तो सोपा झेल पकडता आला नाही. त्यावेळी मार्नस लाबुशेन 21 धावांवर खेळत होता.
विराटचा रागाराग
आपल्या फिटनेस आणि क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जाणारा विराट पृथ्वीच्या या कामगिरीमुळे भडकला. महत्वाच्या खेळाडूचा सोपा झेल सोडल्याने विराटच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. या दरम्यान त्याने पृथ्वीला उद्देशून काहीतरी बडबड देखील केली आणि हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.
ANOTHER chance for Marnus! #AUSvIND pic.twitter.com/zl25xRJjIX
— cricket.com.au (@cricketcomau) December 18, 2020
बुमराहनेही दिले जीवदान
पृथ्वी शॉ याच्या आधी जसप्रीत बुमराह याने देखील मार्नस लाबुशेन याला जीवदान दिले. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर बुमराहने सीमारेषेवर त्याचा झेल सोडला तेव्हा तो 12 धावांवर होता.
अर्थात मार्नस लाबुशेन याचा जास्त काही फायदा घेऊ शकलो नाही. बाद होण्यापूर्वी त्याने 47 धावा केल्या. उमेश यादव याने त्याला पायचीत केले.





























































