
ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंगळवारी (दि. 22) केंद्रीय पथक सोलापूर जिह्याच्या दौऱयावर येत असून, ते अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळ आणि सांगोला तालुक्यांची पाहणी करणार आहे.
ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व महापुराने सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रभरात शेतीपिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची मदत देण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे मदतीचा हात मागितला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या पाहणीसाठी तीन पथके पाठविणार आहे. यातील एक पथक संभाजीनगर, धाराशिव येथील पाहणी करून सोलापूर जिह्यातील नुकसानीची पाहणी करणार आहे.
अतिवृष्टीची सर्वाधिक झळ धाराशिव आणि सोलापूर जिह्यांना बसली होती. या नुकसानीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी करून शेतकऱयांना दिला होता. केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य शासनाने शेतकऱयांना अर्थसाहाय्य करण्याची घोषणा केली आणि पहिल्या टप्प्यात 50 टक्के नुकसानीची रक्कमही दिली आहे.




























































