
राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू यांनी शालेय विद्यार्थ्यांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श (बॅड टच, गुड टच) यामधील फरक समजवण्यासाठी ऑनलाइन लेक्चरचे आयोजन केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दिंडोशी विधानसभेतील 314 शाळांमधील, तर दुसऱ्य़ा टप्प्यात जोगेश्वरी आणि गोरेगाव विधानसभेतील तब्बल 864 शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात आले.
‘गुड टच, बॅड टच’ या महत्त्वाच्या विषयाबाबत विद्यार्थ्यांना सखोल माहिती मिळावी म्हणून अधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत युवासेनेने आयोजित केलेल्या या ऑनलाइन शिबिरात वरिष्ठ शिक्षिका अनघा साळसकर यांनी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी मुलांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्यांना समर्पक उत्तरे दिली. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी युवा विभाग अधिकारी अमित पेडणेकर, रोहन शिंदे, प्रशांत मानकर यांच्यासह युवासैनिकांनी विशेष मेहनत घेतली.























































