…आणि मासा समुद्रात चालायला लागला! पाहा व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शीर्षक वाचून धक्का बसला असेल ना? मासा आणि चालणे.. कसं शक्य आहे.? असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. पण, याचं उत्तर हो असं आहे. या चालणाऱ्या माशाचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

खरंतर आपण निरनिराळ्या तऱ्हेचे, रंगाचे, आकाराचे मासे पाहिले आहेत. अगदी जेवणात शिजवल्या जाणाऱ्या माशांपासून ते मत्स्यालयात दिसणाऱ्या विचित्र आकारांपर्यंत अनेक मासे आपण पाहतो. त्यांचे आकार, रंग, चकाकी आणि सुळकन इथून तिथे पोहण्याचं कौशल्य आपल्याला भावतं. पण, मासा पोहण्याऐवजी चालू लागला, तर आपलं काय होईल?

असाच एक चालणारा मासा शोधण्यात आला आहे. कॅरेबियन समुद्रीजीव तज्ज्ञ आणि लेखक मिकी कार्टरिस यांनी हा मासा शोधला आहे. हा मासा नेहमीच्या माशांपेक्षा वेगळा दिसतो. गडद राखाडी रंगाच्या विचित्र शरीरावर गेंड्यासारखं एक शिंगही दिसतं. दिसायला भीतीदायक दिसणाऱ्या या माशाची चाल मात्र थोडी वेगळी आणि लक्षवेधी आहे. त्याचे ओठ लाल रंगाचे आहेत.

हा मासा समुद्र तळाशी जाऊन चालतो. त्याला माशासारखे पर तर आहेतच पण पायही आहेत. समुद्रतळाशी उतरून हा मासा आपल्या पर आणि पायांच्या साहाय्याने हळूहळू चालतो. छोटे मासे आणि छोटे खेकडे त्याची शिकार आहेत. हळूहळू वाळूवर चालून तो त्यांचा फडशा पाडतो. विशेष म्हणजे गरज असेल तेव्हा हा मासा पोहूदेखील शकतो.

मिकी यांनी पहिल्यांदा जेव्हा हा मासा पाहिला तेव्हा त्यांना विश्वास बसला नाही. कारण, इतकी वर्षं या क्षेत्रात राहून त्यांनी असा वेगळा मासा कधीच पाहिला नव्हता. हा मासा अत्यंत दुर्मीळ असून खूप कमी ठिकाणी आढळतो. या माशाचा एक व्हिडीओही त्यांनी बनवून व्हायरल केला आहे.