
येरवडा येथील एका तरुणाला दोन जणांनी मिळून मारहाण करत लुटले. तरुणाकडून दुचाकी, सोन्याचे लॉकेट, मोबाईल फोन आणि रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 19) सायंकाळी सव्वासहा ते साडेसहा या कालावधीत पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी गावात घडली.
रॉबट शमवेल शिरसाठ (वय 32, रा. येरवडा, पुणे) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिरसाठ त्यांच्या कामानिमित्त शनिवारी चाकण येथे गेले होते. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ते त्यांची दुचाकी (एम एच 12 / पी एफ 3578) घेऊन पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी गावात थांबले होते.
त्यावेळी त्यांच्या पाठीमागून दोन अनोळखी चोरटे एका रिक्षातून आले. त्यांनी शिरसाठ यांना रिक्षात बसून काही अंतर गेले. तिथे त्यांना मारहाण करून दुचाकी, सोन्याचे लॉकेट, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 58 हजार 500 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला.






























































