
पालिकेच्या चतुर्थ श्रेणीत नोकरी मिळवून देऊ अशी बतावणी करीत जवळपास पाचशे बेरोजगार तरुणांना 15 कोटींचा चुना लावणाऱया टोळीतील आणखी चौघांना प्रॉपर्टी सेलने अटक केली आहे. या टोळीतील तिघांना यापूर्वीच अटक केली होती. ते पालिकेचे कर्मचारी तसेच महिला आरोपी माजी पोलीस अंमलदार आहे.
पालिकेची नोकरी मिळवून देऊ असे सांगत बेरोजगारांना फसविल्याप्रकरणी प्रॉपर्टी सेलने प्रकाश सदाफुले, नितीन धोत्रे आणि प्रीती ठाकर यांना अटक केली होती. तर आता पुणाल जाधव, राजेंद्र सप्रे, सतनाम सहानी आणि प्रशांत कामत या चौघांना अटक केली असल्याचे सहआयुक्त मिलिंद भारांबे यांनी सांगितले.























































