
राज्य उत्पादन शुल्क विभाग कणकवलीच्या पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव येथे टेम्पो सह गोवा बनावटीची दारू मिळून 21 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी भरत चव्हाण (28 ) याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 26 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सदरची कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त यशवंत पवार व जिल्हा अधिक्षक एस. बी. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सी. जी. जाधव यांनी ही कारवाई केली. या कारवाईत निरीक्षक दळवी, थोरात, दुय्यम निरीक्षक वायदंडे, गोपाळ राणे, ठाकूर, एस.एस. चौधरी, शिंदे, स्नेहल कुवेस्कर, चव्हाण, यांच्यासह मदतनीस म्हणून खान, साजिद शहा यांनी कामगिरी पार पाडली.



























































