मोहम्मद शमी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीलाही मुकणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुढल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात खेळवण्यात येणाऱया इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधीच यजमान हिंदुस्थानला धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे या कसोटीत खेळू शकणार नाही. अॅडलेड येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मोहम्मद शमीला दुखापत झाली. आता यामधून पूर्णपणे बरा होण्यासाठी त्याला किमान सहा महिने लागणार आहेत. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याची खेळण्याची शक्यता कमीच आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर मोहम्मद शमीच्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील उर्वरित मालिकेमधून त्याला माघार घ्यावी लागली.

याप्रसंगी बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आले की, मोहम्मद शमीच्या हाताला आता प्लॅस्टर लावलेले आहे. प्लॅस्टर काढून टाकल्यानंतर त्याला बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अॅपॅडमीत सराव करावा लागणार आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याचा सहभाग असेल असे वाटत नाही. दरम्यान, हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामधील पहिला कसोटी सामना 5 फेब्रुवारीपासून चेन्नईत खेळवण्यात येणार आहे.